कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ

राज्य शासनाचा निर्णय

0
विलास ताजने, वणी: मागील अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवाल संघटनेद्वारे शासनाकडे केल्या जात आहेत. सदर मागणीची दखल घेत दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ८ जानेवारीला घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोतवालांना सात हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे. विद्यमान आणि नव्याने भरती होणाऱ्या कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे.
त्याचबरोबर नियुक्ती पासून दहा वर्षापर्यंत सात हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे. अकरा ते वीस वर्षांपर्यंत सेवा झालेल्यांना ३ टक्के आणि एकवीस ते तीस वर्षांपर्यंत सेवा झालेल्यांना ४ टक्के वाढ मिळणार आहे. तर एकतीस वर्षांवर सेवा झालेल्यांना सात हजार ८२५ रुपये मिळणार आहे. तसेच पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कोतवालांना १५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. महसूल विभागा अंतर्गत ‘ड’ वर्गात शिपाई पदावर होत असलेल्या नियुक्त्यात सद्या २५ टक्के पदे कोतवालांसाठी राखीव आहे. सदर कोटा वाढवून ४० टक्के करण्यास मान्यता मिळाली आहे.
तसेच कोतवालांना निवृत्ती वेतन दरमहा पाच हजार रुपये मिळेल. पतीच्या मृत्यू नंतर पत्नीलाही निवृत्ती वेतनाचा पूर्ण लाभ मिळेल. अपघात विमा, जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या अमरावती विभागात १९२६ तर नागपूर विभागात १५७९ कोतवाल कार्यरत आहेत. राज्यात गाव वतने नष्ट झाल्यानंतर १ डिसेंबर १९५९ पासून पगारी कोतवाल पद्धती अमलात आणली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.