रोहन आदेवार, वणी: येथील कन्नमवार चौकात बेलदार समाज बहुउद्देशिय संस्था, वणी तथा युवा शहर कार्यकारिणी वणी यांच्या वतीने दि. 10 जानेवारी गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येंने लोक हजर होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज बहु. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार तर प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार हे होते.
10 जानेवारीला दादासाहेब कन्नमवार यांची 119 वी जयंती होती. या निमित्त दोन सत्रात कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या सत्रात सकाळी कन्नमवार पुतळ्याजवळ मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चंदावार यांनी कन्नमवार यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.
द्वितीय चरणात गणपती मंदिर, बेलदारपुरा येथे जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव पांडुरंग ताटेवार, बेलदार समाजकृपा मासिकाचे प्रतिनिधी आनंद एनपोतवार, वणी नगरपरिषदेचे नवनियुक्त बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार व युवा शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष विनोद महाजनवार होते.
सर्व पाहुण्यांनी दिपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी सर्वांनी दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याची व विचारांची आठवण करून दिली. समाजबांधवांनी त्यांच्या जीवनचरित्राची प्रेरणा घेऊन कार्य करायला पाहिजे असे मत मान्यवरांनी मांडले.
कार्यक्रमाचे संचालन उमाकांत जामलीवार यांनी तर आभार राकेश बरशेट्टीवार यांनी केले. कार्यकमास श्रीनिवास एडलावार, आनंद मुत्यलवार, पडलवार सर, अशोक ठाकुरवार, राजेश मार्गमवार, मनोज मसेवार, अमोल गंधेवार, राजू बोईनपल्लीवार, प्रकाश कोंडमवार, पंकज जुब्बेवार, अविनाश पोचमपल्लीवार, रामदास बलचेवार आदी समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन चंदावार, अमोल मसेवार, प्रविण येलपुलवार, अमोल बुग्गेवार, सुनिल बोनगीरवार, सागर बरशेट्टीवार, संदिप मुत्यलवार, आतिष बुरेवार, विशाल बोरकूटवार, नंदकिशोर जुब्बेवार यांनी परिश्रम घेतले.