विवेक तोटेवार, वणी: वणीत शनिवारी कँसरविषयी जनजागृती करण्यासाठी रोड रोलर स्केंटिंग चॅम्पियशीप 2019 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला सकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. टिळक चौक ते लोकमान्य टिळक महाविद्यालयपर्यंत स्केटिंग ट्रॅक असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन सुशगंगा पब्लिक स्कूल व डॉक्टर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सहा गटात घेण्यात येत आहे. पहिला गट हा 3 वर्ष ते 6 वर्ष, दुसरा गट 6 ते 8 वर्ष, तिसरा गट 8 के 10 वर्ष, चौथा गट 10 ते 12 वर्ष, पाचवा गट 12 ते 14 वर्ष तर सहावा गट हा खुला वयोगट असणार आहे. या स्पर्धेतून कँसर बाबत जनजागृतीचा मॅसेज दिला जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक बक्षीसं तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी 200 रुपये आहे.
याबाबत स्पर्धेबाबत डॉक्टर असोसिएशनचे डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
कॅन्सरबाबत शनिवारी सकाळी 11 वाजता मोफर कॅन्सर रोगनिदान शिबिर तर दुपारी 4 वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून खेळातून कॅन्सरबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सुशगंगा पब्लिक स्कूल व डॉक्टर असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना वणीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व 9595954886 व 7744905281 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच नोंदणी सुशगंगा पब्लिक स्कूल, वणी येथेही करता येणार.