विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडीत १८ ते २० जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. भजन स्पर्धेत राज्यस्तरीय गटात ३२ तर ग्रामीण गटात ३९ भजन मंडळाने सहभाग घेतला.
या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाचे उद्दघाटन डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन अडगते होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीताचार्य रुपेश रेंगे, प्रा. विजय वाघमारे, प्रा.डॉ. करमसिंग राजपूत, डॉ.अलोणे, बाळासाहेब पळवे, वाय.आर.खामनकर, सुनील कातकडे, धनराज भोंगळे आदी उपस्थित होते. प्रास्तविक गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी मारोतराव ठेंगणे तर संचालन दत्तू महाकुलकर यांनी केले.
याप्रसंगी ग्रामगीताचार्य स्व. रामकृष्ण दादा बेलूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुदेव प्रचारक भारत कारडे, ताराबाई राखुंडे यांचा शाल, श्रीफळ, मूर्ती, प्रमाणपत्र देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय पुरुष गटात अनुक्रमे महाराणा प्रताप भजन मंडळ यवतमाळ पहिला क्रमांक, हस्तापूर (बाभूळगाव) दुसरा, जुनोना (वासीम) तिसरा, निमगव्हान(अमरावती) चवथा, सोईट (वरोरा) पाचवा, वाघदरा (वणी) सहावा, दहेली (बल्लारपूर) सातवा, हिरापूर (घाटंजी) आठवा, सावंगी( मेघे) नववा तर सुर्ला (आनंदवन) गुरुदेव सेवा भजन मंडळाने दहावा क्रमांक पटकावला.
महिला गटात शेंदूरजना (वाशीम) पहिला, इंदिरानगर(चंद्रपूर) दुसरा, कळंब तिसरा, नागपूर चवथा, शहालंगडी (हिंगणघाट) पाचवा तर भेंडाळा (राजुरा) यांनी सहावा क्रमांक पटकावला. बाल गटात गुरुदेव सेवा भजन मंडळ ताडाळी पहिला, आमडी दुसरा, शेणगाव तिसरा, पिवरडोल चवथा, भेंडाळा (राजुरा) पाचवा तर जैतापूर (चंद्रपूर) सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
ग्रामीण पुरुष गटात गुरुदेव भजन मंडळ नवेगाव (विरकुंड) पहिला, कारेगाव (झरी) दुसरा, सिंधी वाढोना तिसरा, रांगणा चवथा, अहेरी(बोरगाव) पाचवा, वेगाव भजन मंडळाने सहावा क्रमांक पटकावला. महिला गटात मंजुळमाय मंडळ मुर्दोनी पहिला, गुरुदेव मंडळ चिखलगाव दुसरा, वणी (भोंगळे ले आऊट) तिसरा तर शंकरबाबा भजन मंडळ चिखलगावने चवथा क्रमांक पटकावला. तर बाल गटात बाळापूर पहिला, कारेगाव दुसरा तर सिंधी महागाव भजन मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला.
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी शेट्टे, मंगला डुंबरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कडुकर, गजानन बोढे, शारदा बलकी, प्रकाश कुचनकर, शोभा रिंगोले, लक्ष्मण जुमनाके, अनिल बेलेकार, सिंधु गिरटकर, शंकर चटप, शंकर किनाके, नानाजी बदखल, भाऊ ढाले, गौरशेट्टीवार, वसंत नंदगीरवार, गिरी गुरुजी, गेंदलाल जोशी, सचिन गौरकार, प्रमोद राजूरकर, हनुमान पेटकर, भाऊ येटे, मधुकर खिरटकर, सुधाकर भोयर, संजय शिरपूरकर, भास्कर सोमलकर, बाबाराव कुळमेथे, नानाजी लांडे, सुभाष पारखी, तानेबाई निंदेकर, भाऊ डोनेकर, माला देरकर, वनिता किन्हेकर, स्नेहलता कुचनकर, प्रतिभा फाले, छाया बदखल, माया माटे, रवींद्र देवतळे, अमोल गौरकार, ताई गोवारदीपे आदींनी परिश्रम घेतले.
लिंकवर भजनाचा व्हिडीयो…