वणी, विवेक तोटेवार: पुलवामा येथे कडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या भारतीय वीर सैनिकांना वणीतील शाळा, महाविद्यालयाद्वारे रॅली काढून आदरांजली वाहण्यात आली. यात हजारों विद्यार्थी सहभागी झाले होते.
14 फेब्रुवारी गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 49 भारतीय सैनिकांना वीरमरण आले. या अत्यंत दुर्दैवी व दुखदाई घटनेचा शनिवारी वणीतील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅली काढून निषेध केला व टिळक चौकात सैनिकांना श्रद्धांजली वाहली.
रॅलीची सुरवात लोकमान्य टिळक महाविद्यालया पासून झाली. ही रॅली मार्गक्रमण करीत टिळक चौकात आली. टिळक चौकातून खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागौर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत टिळक चौकात पोहचली. रॅली बघणारे अनेक जण वाटेत या रॅलीत सहभागी होत होते.
‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘वीर जवान अमर रहे’ असे नारे रॅलीत सहभागी प्रत्येक विद्यार्थी देत होते. रॅलीत जवळपास पाच ते सहा हजार विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होते.
रॅली टिळक चौकात आल्यानंतर या ठिकाणी नरेंद्र नगरवाला यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आता आपल्या भारताच्या सीमा अफगाणिस्तान पर्यंत वाढवायला पाहिजे व पाकिस्तानावर कूच करून संपूर्ण पाकिस्थान हा आता भारतात शामिल करून घ्यावा की ज्यामुळे या आतंकवाद्याना सहन देणाऱ्या देशाचे कोणतेही अस्तित्व उरु नये.
महेंद्र लोढा यांनीही आपले मत व्यक्त केले. आता सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारवाई अशी असावयास हवी की हे कृत्य करणाऱ्यांच्या अनेक पिढ्या भारताकडे मान उंचावूनही बघणार नाही. टिळक चौकात जमलेल्या प्रत्येकाने या ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.