स्मार्ट श्रीमती व युवती तर्फे महिला ग्रुप मेळाव्याचे आयोजन
विविध स्पर्धा आणि कार्यशाळेचे आयोजन
सुरेंद्र इखारे, वणी: येथील स्थानिक वसंत जिनींग सभागृहामध्ये स्मार्ट श्रीमती व युवती ग्रुप तर्फे व जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला रोजगार आणि बचतगटासंबंधी माहिती या विषयासंबंधी मेळाव्याचे आयोजन तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ब्राम्हण सभेचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार, महिला बचत गटाच्या ऍड. पौर्णिमा शिरभाते, सुरेंद्र नालमवार, अखिल भारतीय संस्कृतीत मंडळाचे अध्यक्ष ऍड. प्रवीण पाठक उपस्थित होते. या प्रसंगी दहावी बारावी नंतर पुढील शिक्षण या विषयावर गजानन कासावार यांनी मार्गदर्शन केले तर रोजगार कसा उपलब्ध करता येतो व व्यावसायिक शिक्षण तसेच रोजगाराला बचतगटाची कशी मदत होते या संबंधीचे मार्गदर्शन सुरेंद्र नालमवार व पौर्णिमा शिरभाते यांनी मार्गदर्शन केले.
येत्या रामनवमीच्या शोभायात्रे मध्ये महिलांना सहकार्य कसे करता येईल याविषयीची माहिती रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी दिली. महिलासंबंधीत कायदाविषयक माहिती ऍड. प्रवीण पाठक यांनी दिलं . मेळाव्याचे आयोजन पायल परांडे व प्राजक्ता परांडे व मंजुषा लोथे यांनी केले.
या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेल्या फॅशन व पोशाख स्पर्धेमध्ये माधवी मालीकर प्रथम तर मेहजबीन खान द्वितीय नृत्यस्पर्धेमध्ये पायल राऊत व रवली दिवटे ग्रुप मध्ये प्रथम माया मांडवकर आणि ख़ुशी खिरेकर ग्रुप द्वितीय, वादविवाद स्पर्धेमध्ये गोपिका सोमय्या ,एक मिनिट स्पर्धेमध्ये सुजाता रामटेके प्रथम व धनश्री चाचाने द्वितीय, रांगोळी स्पर्धेमध्ये मनीषा चुंबळे प्रथम तर जोत्सना राठोड यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.