महसूल विभागाची आणखी दोन हायवावर कार्यवाही
गुरुवारी रेती ट्रक सोडल्याने "मसालेदार' चर्चेला उधाण
विवेक तोटेवार, वणी: 27 मार्च बुधवार महसूल विभागाद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. या धडस्त्रात संशयास्पद 7 ट्रॅक्टर व एक हायवा असे एकूण आठ वाहन पकडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता दोन रेती वाहतूक करणारे हायवा तहसील कार्यालयात आणल्या गेल्याचे वृत्त आहे. अगोदर पकडण्यात आलेल्या वाहन मालकांना खुलासा मागवीण्यात आला होता. एक दिवस वाहन त्याच ठिकाणी उभे होते. दुसऱ्या दिवशी त्यातील एक हायवा वाहन सोडून देण्यात आल्याने याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
बुधवारी एकाच रस्त्याने येणाऱ्या 7 ट्रॅक्टर व एक हायवा वाहन असे एकूण सात वाहनांना तहसील कार्यालयापुढे आणण्यात आले. या वाहन धारकांना खुलासा मागण्यात आला. यातील हायवा मालकाने एक न पटणार खुलासा दिला व महसूल विभागाने सदर वाहन सोडून दिले त्यामुळे ऐन निवडणुकीच्या ज्वर शिगेला असतानाही या रेती ट्रकबाबत मसालेदार चर्चा परिसरात रंगत आहे.
खुलासा संशयास्पद का?
या खुलशात त्यांनी गोंडपिपरी इथून बल्लारशाह इथे जात होतो असा उल्लेख केला आहे. आता बल्लारशाहला जाण्यासाठी कोणताही वाहन चालक वणीमार्गे जात नाही हे लहाण मुलंही सांगू शकतं. सकाळी गेलेले वाहन संध्याकाळी महसूल विभागाच्या ताब्यात कसे येते? गोंडपिपरीहून निघालेले वाहन संध्याकाळी वणीत कसे? गोंडपिपरीहून वणीला यालला अख्खा दिवस जात नाही. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो. महसूल विभागाला कल्पना असते की असे खुलासे केले जातात. त्यावर टोलटॅक्सची पावती यासारखे पुरावे का तपासल्या गेले नाही. तहसीलदार धनमणे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की आम्ही फक्त पास तपासतो. पास असल्यास वाहन सोडून देण्यात येते.
शुक्रवारी सकाळी अशाच प्रकारचे हायवा वाहन रेती नेट असतांना वाहतूक विभागाद्वारे पकडण्यात आल्याची माहिती आहे. सदर वाहन हे वर्धा येथील एक व्यक्तीचे असल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजत हे दोन्ही वाहने वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरलोड असल्याने आणले. आता या वाहनांवर महसूल प्रशासन काय कारवाई करणार की, या वाहनसही तात्पुरता खुलासा मागून सोडण्यात येईल हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल.
मागील अनेक महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नवहता. 9 मार्च रोजी तालुक्यातील एक घाटाचा लिलाव झाला. परंतु या घाटातून रेती तस्कर रेती काढत नसून न लिलाव झालेल्या घाटातील रेतीवर ताव मारीत आहे. त्यातच एकाच पासवर लिलाव झालेल्या घाटातून अनेक फेऱ्या मारीत असल्याची माहिती अनेकांना आहे. परंतु महसूल विभाग गेल्या अनेक महिन्यापासून कुंभाकर्णी झोपेत असल्याचे सोंग घेऊन आहे.
(उद्याच्या भागात रेती तस्करीचा संपूर्ण लेखाजोखा)