यवतमाळ-मुकुटबन रात्रकालीन बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

0

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, स्कूल ,कॉलेज रुग्णालय, खाजगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावे लागत होते परंतु सदर बस बंद झाल्याने तालुक्यातील प्रवाश्यांचे मोठे हाल झाले आहे.

Podar School 2025

पांढरकवडा आगाराची बस गेल्या २० वर्षांपासून यवतमाळ ते मुकुटबन करिता रात्रकालीन सुरू होती परंतु ८ दिवसापासून ही रात्रकालीन बस बंद करण्यात आली आहे बस बंद बाबत विचारणा केली असता मुकुटबन येथील एक खाजगी बस सकाळी शासकीय बसच्या अगोदर समोर जाऊन सर्वच प्रवासी वाहून नेत असल्यामुळे शासकीय बसला प्रवासी मिळत नसल्याने तसेच शासनासाचे नुकसान होत असल्याने रात्रकालीन बस बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

खाजगी बसमुळे वीस वर्षांपासून सुरू असलेली बस बंद झाल्याने पांढरकवडा ते पाटणबोरी, पाटण मुकुटबन मार्गावरील शेकडो लोकांची हाल होत असून सदर बस त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. मुकुटबन वरून यवतमाळ करीता दररोज सकाळी ६.१५ वाजता निघते व या मार्गावरील पाटण, सुरदापुर, कमळवेळी, सतपल्ली, दाभा या गावातील शालेय विद्यार्थ मोठ्या प्रमणात शाळेत जाण्याकरिता बसतात व शाळेच्या वेळेवर पोहचतात परंतु सदर बस बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.

बस पास असूनही वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही आहे विद्यर्थांचे परीक्षा काळातच बस बंद झाल्याने पेपर सुद्धा वेळेवर देने कठीण होत आहे. तसेच सिनियर सिटीजन (वयोवृद्ध) यांनासुद्धा अर्ध्या तिकीटमध्ये जाणे कठीण झाले आहे. रात्रकालीन बसने पहाटे जाणे व सायंकाळी ९ वाजेपर्यंत शासकीय ,खाजगी व इतर कामे करून तालुक्यातील जनता घरी परत येत होती परंतु रात्रकालीन बस बंद झाल्याने पांढकवडया वरून मुकुटबन पर्यंत यायला एकही बस नसल्याने प्रवाश्यांना पांढरकवडा मुक्काम करून आर्थिक भुदंड सोसावे लागत आहे. तरी यवतमाळ- मुकुटबन रात्रकालीन बस त्वरित सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी वर्गातून होत आहे. बस सुरू न केल्यास काही युवक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.