शेतकऱ्यांना तूर अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र
४ एप्रिलला खरेदी बंद, माल आणण्याचा मॅसेज १२ तारखेला
सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी शेतकरी नापिकी व खासगी कर्जामुळे हवालदिल होऊन आत्महत्या करीत असल्याचे वास्तव असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर गदा येण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील मुकुटबन येथे सण २०१९-२० मध्ये नाफेड मार्फत १ एप्रिल ते ३ एप्रिल पर्यंत तूर खरेदी करण्यात आली. ३ एप्रिल पर्यंत ६५ शेतकऱ्यांचे ६८५.१० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. व ४ एप्रिल पासून तूर खरेदी पूर्णतः बंद करण्यात आली.
तालुक्यातील ६६४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु ६५ शेतकऱ्यांनी तूर विक्री करीता आणल्याचे पाहून उर्वरित ५९७ शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघाकडून तूर खरेदी बंद असताना शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकून तूर खरेदी केंद्रावर आणण्याचा मेसेज आला. हा प्रकार शेतकऱ्यांना फसविण्याचा व दिशाभूल करून अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करीत असल्याची ओरड शेतकऱ्याकडून होत आहे.
४ एप्रिलला तूर खरेदी बंद झाल्यावर तूर विक्रीकरिता आणण्याचे मेसेज कशासाठी? असा संतप्त प्रश्न शेतकरी करीत आहे. जर शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता आणले असते तर शेतकऱ्यांना किती त्रास झाला असता व परिस्थिती वेगळीच झाली असती असेही बोलले जात आहे. खरेदी विक्री संघाने बाजार समितीचे सभापती लक्ष्मण उर्फ संदीप बुरेवार यांना सुद्धा मोबाईलवर मेसेज पाठवून तूर केंद्रावर आणण्याचा मेसेज १२ एप्रिलला दुपारी २ वाजून ४४ मिनिटाला पाठविल्याने सभापती अचंबित झाले. त्यांनी बाजार समितीतीचे सचिव रमेश येल्टीवार यांच्याकडून तूर खरेदी बाबत माहिती घेतली असता ४ एप्रिल पासून तूर खरेदी बंद झाल्याची माहिती येल्टीवार यांनी दिली.
सभापती बुरेवार त्यांनाही तुरी आनन्याचे बोगस मेसेज मोबाईल वर आल्यावरून खरेदी विक्री संघ किती कामात तत्पर आहे हे पाहून सभापती यांनी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांना तक्रार दिली. तूर खरेदी बंद असतांना मोबाईलवर मेसेज टाकून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. खरेदी विक्री संघ हे शेतकऱ्यांना बोगस मेसेज पाठवुन शेतकऱ्याची संख्या कमी दाखवून शासनाकडून मीळनाऱ्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीतून केले आहे. तसेच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अनुदान बुडविण्याची तयारी शासनाने चालविल्याचे बोलले जात आहे.
शासनाकडून मागील वर्षीप्रमाणे अनुदान मिळाले नाही व शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले तर याला जवाबदार खरेदी विक्री संघ राहील असे तक्रारीत नमूद केले आहे. नाफेड मार्फत तूर खरेदी तीनच दिवसात का बंद केली अशी माहिती काढली असता बारदाने नसल्याने बंद झालयाचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे खरेदी विक्री संघाच्या एका संचालकाने २ एप्रिल रोजी आपल्या नातेवाईकांचे तूरी विक्री करीता केंद्रावर आणले होते तूर खराब असल्याने सदर तूर घेण्यास केंद्र प्रमुखाने नकार दिल्याने गाडीचा ड्रायवर व सदर संचालकाने केंद्र प्रमुखाची कॉलर पकडून हंगामा केल्याने तूर खरेदी बंद झाल्याचेही चर्चा शेतकर्यांडून होत आहे.
तूर खरेदी बंद करण्याकरिता वरूनच तोंडी आदेश आल्याचीही चर्चा आहे.शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे व खोटे मेसेज टाकून शेतकऱ्यानं फसविण्याचे कार्य कुणाचे असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गाकडून होत आहे. शासनाकडून मालाची खरेदी ७|१२ प्रमाणे तर अनुदान पेरव्यप्रमाणे दिले जाते त्यामुळेही शासणांविरुद्धही शेतकऱ्यांत नाराजी आहे.शेतकर्यांना खोटे मेसेज टाकून फसविणार्या व असे आदेश देणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांत प्रचंड संताप होत असून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवल्यास मोठे आंदोलन केल्या जाणार असल्याचे सभापती बुरेवार यांनी सांगितले.