पिंपळगाव येथे भीम जयंती उत्साहात साजरी

0 460

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवुन सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश सुर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद वानखेडे, रामा वेले, उमा निमसटकर, विठ्ठल कांबळे, रवीचंद्र मत्ते होते.

यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आकाश सुर यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना बाबासाहेबांनी केलेले कार्य घराघरात पोहोचवण्याचे काम अविरत करत राहणार तसेच उपस्थित जनतेला सुद्धा आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश कांबळे यांनी केले तर आभार सुरज कांबळे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी अशोक वाघमारे, प्रवीण वानखेडे, देविदास मत्ते, शांताराम वाघमारे, प्रफुल वानखेडे, संदीप कुळमिथे, वामन नवघरे, मंगल आवारी, प्रकाश आवारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Comments
Loading...