विजेचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासून चार किमी  अंतरावर असलेल्या भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे  तीन  वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची  घटना 18 एप्रिल ला सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली.  ओम सुनील गदई असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव  आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त  माहितीनुसार  भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे आपल्या  आजोबाच्या घरी  ओम  रोज  खेळायला जायचा आज  सुद्धा  घरी  खेळत  असतांना घराच्या  सिमटीतुन आजी कडे जात असताना त्याचा विद्युत प्रवाह असलेल्या अर्थिंग तारेचा स्पर्श झाला. त्याला जोरदार  शॉक लागल्याने तो जागीच खाली पडला. लोकांची  आरडा  ओरड  सुरु  झाली, लगेच  त्याला  उपचारासाठी  मारेगाव येथील ग्रामीण  रुग्णालयात  दाखल  करण्यात  आले.

दरम्यान  डॉक्टरांनी  तपासणी केल्यानतंर  त्याला  मृत  घोषित  केले. ‌या घटनेची  माहिती  विद्युत  विभागाला  देण्यात आली असून गांवात  बालकाच्या  मृत्यू  मुळे  शोककळा  पसरली  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.