ज्वारीचे फुटवे खाल्याने दोन गाईंसह कालवड व गोऱ्याचा मृत्यू
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील चार शेतकऱ्यांच्या जनावरांनी शेतात जाऊन ओले फुटवे खाल्याने फुगून मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार गणेशपूर येथील शेतकरी बंडू नीखाडे, सुधाकर मडावी, भुजंग गेडाम व विठ्ठल आसुटकर यांचे जनावरे १९ एप्रिल ला सकाळी चरण्याकरिता गेले परंतु सायंकाळी बंडू नीखाडे यांचे चार जनावरपैकी दोन गाई परत आल्या व कालवड व गोरा परत आले नाही तसेच वरील तिनही शेतकऱ्यांच्या सुद्धा गायी परत आल्या नाही.
दुसऱ्या दिवशी २० एप्रिलला चारही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा शोध घेतला असता अडेगाव येथील मांडवकर यांच्या शेतात चारही जनावरे मृत अवस्थेत आढळली. जनावरांच्या मृत्यू बाबत माहिती काढली असता शेतातील ज्वारीचे फुटवे जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांचे पोट फुगले व मृत्यू झाल्याचे कळले.
निखाडे यांचे दोन गायी फुटवे खाऊन परत आल्या दोन्ही गायीवर उपचार केल्याने वाचले. चारही शेतकऱयाचे मिळून दोन गायी एक कालवड व एक गोरा यांचा शेतातच मृत्यू झाला. याबाबत शेतकऱ्यांनी डॉक्टरांना बोलावून जनावरांचीी वैद्यकीय तपासणी केली व पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पुढील तपास मोहन कुडमेथे व जितेंद्र पानघाटे करीत आहे.