आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निवेदन
काँग्रेस कमिटी व आदिवासी समाजाची कार्यवाहीची मागणी
सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यातील इन्फॅन्ट जिजस पब्लिक स्कूलच्या वसतीगृहातील आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. याविषयी विविध आदिवासी संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. इन्फॅन्ट जिजस स्कूल ही काँगेसच्या अध्यक्षाची असून घडलेल्या घटनेवर आ. विजय वडेट्टीवार चंद्रपूर यवतमाळ लोकसभेचे उमेदवार बाळु धानोरकर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे, सुभाष माईनवार यांनी संयुक्त पत्रकार घेऊन पोक्सो कायद्या अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीकरिता आदिवासी पालकांकडून खोट्या तक्रारी पोलीस स्टेशनला देतात. तसेच खोट्या तक्रारी देण्याचा आदिवासीयांचा धंदाच झाल्याच्या घृणास्पद व संतापजनक आरोप केल्याने जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चे, रास्ता रोको झाले. याचे पडसाद तालुक्यात उमटले असून घटनेचा रोष झरी तालुक्यातही दिसून येत आहे. इन्फॅन्ट जिजस पब्लिक स्कूलच्या आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कार्यवाही करा अशा मागणीचे निवेदन काँगेस तर्फे तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना २५ एप्रिलला देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष भूमारेड्डी बाजनलावार, महिला अध्यक्ष शुभांगी बेलखेडे, राजू कासावार, राजीव येल्टीवार, बंडू आडे, संदीप बुरेवार, राहुल दांडेकर,भगवान चुकलवार, निलेश येल्टीवार, राकेश गेलेवार, बळी पेंदोर,संजय भोयर पतिराम आत्राम, वसंता पेंदोर, नितेश खडसे, प्रदीप बेलखेडे, पंजाराम पेंदोर, हरिदास गुर्जलवार, राजू मडावी, राजू उमरे, संतोष नेल्लावार,अशोक पिंगे ,महेश कावटवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.