परमडोहच्या शाळेत पार पडली विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक

निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा

0
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत चिमुरड्यांनी सहभाग घेतला. नामांकन दाखल करण्यापासून तर निकाल घोषित करण्यापर्यंतची प्रक्रिया शिक्षकांच्या मार्गदर्शनात अचूक पूर्ण केली.
यात शाळा मुख्यमंत्री पदी दिनेश गणपत राजूरकर, उपमुख्यमंत्री पदी प्रांजली विनोद थेरे, क्रीडा मंत्री नयन संदीप डवरे, अर्थमंत्री (शालेय बँक व्यवहार) चैताली देविदास राजूरकर, पोषण आहार समिती सानिया संजय राजूरकर, वृक्षारोपण व संवर्धन मंत्री भूषण मिलिंद राजूरकर, ग्रंथालय मंत्री कावेरी संदीप डवरे, सांस्कृतिक मंत्री तन्मय प्रफुल काकडे, परिपाठ समिती मंत्री सुमित सूर्यभान कोडापे, स्वच्छता मंत्री ओमसाई विनोद येलेकर यांची निवड झाली.
मुख्याध्यापक हंसराज काटकर, शिक्षक निलेश सपाटे, ताई निकुंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.