स्वतंत्र संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी

संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
सुशील ओझा, झरी: जिह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच राज्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, एनडीए, बँकिंग तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थाना मोफत संशोधन प्रशिक्षाकरिता मार्गदर्शन मिळाले पाहिजे. अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे व झरी तालुकाध्यक्ष देव येवले यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओबीसी, एनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का वाढत असताना अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. ओबीसी विद्यर्थाना सन्मानपूर्वक न्याय मिळाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि उच्च शिक्षण घेण्याची जिज्ञा असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना संधी मिळावी याकरिता महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांकरिता ओबीसी संशोधन व मानव विकास संस्था स्थापन करावी.
राज्य सरकारने महाराष्ट्रात शेतीवर आधारित ओबीसी, एनटी व सबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षण पर मोफत मार्गदर्शन मिळाले पाहिजे. तसेच दिल्लीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यर्थाना याचा फायदा होईल. सारथी संस्थेत मराठा व कुणबी मराठा जातीचा समावेश आहे. या समाजाची विद्यार्थी संख्या जास्त प्रमाणात आहे. म्हणून सारथी संस्थेच्या धर्तीवर ओबीसी करिता स्वतंत्र संस्था स्थापन करावे तसेच स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा निर्माण करावी ओबीसींचा सारथी संस्थेत समावेश करून स्वतंत्र संस्था स्थापन करून न्याय देण्यात यावा.
ओबीसी संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेला राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याराणी होळकर,स्वराज्य संघटक मल्हारराव होळकर संस्था यापैकी कोणतेही एक नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे व झरी तालुकाध्यक्ष देव येवले यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.