नोकरीचे आमिष दाखवून 60 हजारांचा गंडा

परदेशात नोकरी लावून देण्याची बतावणी करून फसवणूक

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरूनगर भागात राहणाऱ्या एक तरुणास नोकरीचे आमिष दाखवून 60 हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. परदेशात जेसीबी ऑपरेटरची नोकरी लावून देतो असे सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.

Podar School 2025

गुरूनगर भागात सैय्यद इरफान अली सैय्यद इरफान अली (31) हा तरुण राहतो. तो जेसिबी ऑपरेटचे काम करतो. गेल्या चार महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याने एका जॉब प्लेसमेंट साईटवर बायोडेटा टाकला होता. काही दिवसांनी त्याला तनविर नामक व्यक्तीने नोकरीबाबत मेल पाठविला. काम हे दुबईला थर्मो कंपनीमध्ये होता व दुबई करंसीनुसार 2200 पगार होता. जी रक्कम भारतीय करंसीनुसार सुमारे 40 हजार रुपये होते. यावर इरफानने 1 ऑक्टोबर 2018 मध्ये मेल पाठवून कामाकरिता होकार दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

23 ऑक्टोबरला इरफानला कन्फरमेशन मेल आला. त्यानंतर तानविर याने 15 हजार रुपये त्याच्या बँकेच्या खात्यात टाकण्यास सांगितले. इरफानने त्याचा मित्र असलम खान यांच्या खात्यातून भीम ऍप द्वारा युनियन बँकेच्या खात्यातून 15 हजार रुपये पाठविले. त्यानंतर 10 हजार रुपये विजा काढण्याकरिता पाठविण्यास सांगितले तसेच 35 हजार रुपये तिकीटसाठी पाठविण्यास सांगितले. इरफानने हे सर्व पैसे पाठविले.

त्यानंतर इरफानने पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधला असता. तनविरचा फोन बंद आला होता. अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता संबंधित खाते हे अहमदाबाद गुजरात येथील असल्याने इरफानच्या लक्षात आले. अखेर फसवणूक करणा-या इसमविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात इसमविरुद्ध कलाम 468, 420नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.