बलदेव शर्मा यांचे दीर्घ आजाराने आज 22 एप्रिलला निधन

वणीतील मोक्षधाम येथे उद्या 23 एप्रिलला होतील अंतिम संस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: येथील एका नामांकित साप्ताहिकाचे संस्थापक संपादक दिवानचंद शर्मा यांचे बंधू बलदेव शर्मा (84)यांचे प्रदीर्घ आजाराने आज मंगळवार दिनांक 22 एप्रिलला सायंकाळी 7.00 च्या सुमरास निधन झाले. त्यांच्यावरती वणीतच उपचार सुरू होते. त्यांची अंतिम यात्रा जटाशंकर चौकातील त्यांच्या घरून उद्या मंगळवार दिनांक 23 एप्रिलला सकाळी 11.00 वाजता निघेल. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम इथे अंतिम संस्कार होतील. गेल्या अनेक वर्षांपासून ते पौरोहित्यात अग्रेसर होते. मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून त्यांची होती. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Comments are closed.