बहुगुणी डेस्क, वणी: वरझडी देवस्थान इथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भाजपचे शहर अध्यक्ष व श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरात वेगवेगळे देसी झाडे लावण्यात आले. यावेळी लावलेले प्रत्येक झाड उपस्थितांनी दत्तक घेतले व त्याचे संगोपण करण्याची शपत घेतली.
पावसाळा हा ऋतू वृक्षारोपणासाठी सर्वोत्तम समजला जातो. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करंज, कडूनिंब, पिंपळ अशा देशी झाडांचे रोपटे देवस्थान परिसरात लावण्यात आले.
वरझडी देवस्थान केवळ एक देवस्थान म्हणूनच प्रसिद्ध नाही तर इथे पर्यटनाला देखील वाव आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेला हा परिसर केवळ भाविक भक्तांनाच नाही तर पर्यटकांनाही आकर्षीत करतो. त्यामुळे या भागाचा पर्यटनासाठी विकास केल्यास इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांसह पर्यटकही याठिकाणी भेट देईल. त्याचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
– रवि बेलूरकर