पैनगंगा व खुनी नदी किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा
प्रशासनाची नदीकाठावरील गावांना भेट
सुशील ओझा, झरी: गेल्या चार दिवसांपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असून तालुक्यातील अनेक नाले तुडुंब भरले आहे. तर पैनगंगा व खुनी नदीही दुथडी भरून वाहत आहे. सततच्या पावसनाने जनजीवनही विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी व चिखल दिसत आहे.
या पावसाची प्रशासकीय यंत्रणेने वेळीच दखल घेऊन नदीकाठावरील गावात जाऊन गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील सर्वाधिक पुरामुळे धोका दुर्भा, धानोरा, दिग्रस व हिरापूर (जुना) या गावाना असतो. याव्यतिरिक्त वठोली, सतपेल्ली, अहेरअल्ली, मांडवी, टाकळी, डोर्ली, खातेरा, हिरापूर व राजूर या गावना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो ज्यामुळे महसूल विभागाकडून प्रत्येक तलाठी मार्फत तर पोलीस विभाकडून पोलीस पाटील तर्फे गावात जाऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याची संदेश देत आहेत.
चार दिवसांपासून सतत पावसामुळे शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली आहे. अजून २४ तास मुसळधार पाऊस राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. शेतकरी संकटात जाणार तर नदी काठावरील अनेक गावे पाण्याखाली जाणार हे निश्चित. प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर हे दोन दिवसांपासून आपला ताफा घेऊन नदीकाठावरील गावे तलाव यांची पाहणी करीत असून याची माहिती वरिष्ठांना देत आहे.
मुकूटबनचे ठाणेदार धर्मराज सोनुने,पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे व पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे हे सुद्धा दोन दिवसांपासून नदीकाठावरील प्रत्येक गवत जाऊन जनतेला सतर्क करून कोणतीही घटना घडल्यास पोलीसना व पोलीस पाटलांना माहिती देण्यास सांगितले आहे.
दरम्यान पैनगंगा व खुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु सद्या कोणत्याही गावाना पुराचा धोका नसल्याचे प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी दिली आहे. तर काही काळासाठी वणी ते मुकूटबन मार्ग आदीलाबाद बंद झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली. या मार्गावरील पेटूर गावाजवळील पूलावरून पाणी वाहत असल्याने तसेच उमरी गावाजवळ एक मोठे झाड पडल्याने हा मार्ग बुधवारी सायंकाळ पर्यंत बंद होता.