महिलांच्या सक्षमीकरणाकरिता मारेगाव येथे गुरूवारी मेळावा
डॉ. लोढांच्या नेतृत्वात आधार महिला व बालविकास संस्थेचे आयोजन
ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने राष्टवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात मांगरूळच्या आधार महिला व बालविकास संस्थेचे महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित केला आहे. गुरूवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मारेगाव येथील बदकी भवन येथे सकाळी दुपारी 1 ते चार या वेळेत हा मेळावा होईल.
या मेळाव्याचे उद्घाटन आमदार ख्वॉजा बेग करतील. अमरावती येथील यशदाच्या प्रशिक्षक नीलिमा काळे महिलांना मार्गदर्शन करतील. गृहोद्योग, लघुउद्योग आणि स्वयंरोजगारातील विविध क्षेत्रांतील संधींबद्दल त्या माहिती देतील. लघुउद्योगांत महिलांना काय काय करता येईल यावर मीनाक्षी इंगोले मार्गदर्शन करतील. लघुउद्योगांतील त्यांचं कार्य, अनुभव आणि अभ्यासाचा उपस्थितांना लाभ होणार आहे.
पतपुरवठा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी आणि अन्य प्रक्रियेबद्दल डॉ. महेंद्र लोढा मार्गदर्शन करतील. ज्या प्रशिक्षणासाठी हजारो रूपये खर्च करावे लागतात, तेच मार्गदर्शन इथे मोफत होईल. या मेळाव्यात यशस्वी उद्योजिकांचा, बचतगट मार्गदर्शिकांचा सत्कार होईल. या मेळाव्यात महिलांना मोठ्याा संख्येने सहभागी होण्याची विनंती मुख्य आयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी केली आहे.