वणीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
9 ऑगस्ट रोजी दिवसभर सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल
विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी 9 वाजता भीमालपेन देवस्थान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी 11 ते 3 दरम्यान त्याच ठिकाणी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नामवंत डॉक्टर गरजू रूग्णांची तपासणी करणार आहे. डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर होणार आहे. तर 11 ते 5 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीतील विविध आदिवासी संघटना व सामाजिक संघटनेद्वारे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही मोठ्या प्रमाणात भीमालपेन देवस्थान येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद, ऑल इंडिया एससी एसटी ओबीसी कॉन्सिल ऑल इंडिया, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन वणी, आदिवासी विकास परिषद, गोंडवाना टायगर सेना, गोंडवाना संग्राम परिषद, गोंडवाना अस्मिता परिवार, आदिवासी एकता विचार मंच भीमनगर, आदिवासी समिती दामले फैल, आदिवासी जनजागृती युवा संघटना राजुर, बिरसा मुंडा समिती खांदला, बोरगाव, शिरपूर यासह विविध सामाजिक संघटना यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन विविध संघटना द्वारे स्वप्नील धुर्वे यांनी केली आहे.