मारेगावात महिला उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद
900 पेक्षा अधिक महिलांनी घेतले स्वरोजगाराचे धडे
ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात मारेगाव येथे आधार महिला व बालविकास संस्थेच्या सहका-याने महिला सक्षमीकरण मेळावा पार पडला. गुरूवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मारेगाव येथील बदकी भवन येथे हा मेळावा झाला. यात सुमारे 900 महिला सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात महिलांना स्वयंरोजगारासाठी फिनाईल, क्लिनर इत्यादी घरगुती वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
या मेळाव्याचे उद्घाटन आमदार ख्वॉजा बेग यांनी केले. अमरावती येथील यशदाच्या प्रशिक्षक नीलिमा काळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी गृहोद्योग, लघुउद्योग आणि स्वयंरोजगारातील विविध क्षेत्रांतील संधींबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. लघुउद्योगांत महिलांना काय काय करता येईल यावर मीनाक्षी इंगोले यांनी मार्गदर्शन केले. तर क्रांती राऊत यांनी लघुउद्योगांतील पतपुरवठा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी आणि अन्य प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.
लवकरच महिलांसाठी पतपेढीची स्थापना
मेळ्याव्यात बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महिलांना फिनाईल व क्लिनर तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला कर्तबगार असतात. त्यांच्यात व्यवसाय किंवा गृह किंवा लघू उद्योग करण्याची जिद्दही असते. मात्र सर्व गणित पैशात अडते. त्यामुळे महिलांसाठी लवकरच एक पतसंस्था काढून त्यातून बचत गटातील महिलांना विना व्याज भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. तसेच ज्या महिलांना इतर व्यवसायाचे प्रशिक्षण हवे आहे त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या मेळाव्यात यशस्वी उद्योजिका, बचतगट मार्गदर्शिकांचा उपस्थित अतिथिंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मत्ते यांनी केले, तर आभार अंकुश मापुर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितीन गोडे, दयाल रोगे, स्वप्निल धुर्वे, जिजा वरारकर, सुरेखा भादीकर, नरेंद्र चौधरी, प्रफुल्ल भगत, रामकिसन राऊत यांच्यासह आशाताई टोंगे, पूजा गढवाल, हेमलता लामगे, विजयी आगबत्तलवार, संगीता खटोड, महेश पिदूरकर, सोनू निमसटकर, मारोती मोहाडे, प्रमोद एडलावार, सैयद रविश, महादेव काकडे, राजू उपरकर, संतोष आत्रम, राजू पाचभाई, भास्कर पिंपळकर, योगेश खुटेमाटे, भास्कर आत्राम दिलिप जेनेकर, रमेश बावणे आदींनी परिश्रम घेतले.