सुशील ओझा, झरी : तालुका विधी समिती झरी पोलीस स्टेशन मुकूटबन व पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मुकूटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ९ ऑगस्ट रोज फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. लोक न्यायालयात तालुक्यातील मोटर वाहन कायद्या अंतर्गत व इतर केसेस असलेल्या सर्वच लोकांना पोलिसांकडून बोलवण्यात आले. आपल्या केसेसचा निपटारा करण्याचे सांगण्यात आले होते.
जनतेला न्यायालयात प्रत्येक वेळेस जाणे शक्य होत नाही. कोणतीही कामे, अडचण किंवा एखादी घटना दुर्घटना होते. त्यामुळे जनतेला न्यायालयात जाणे शक्य होत नाही. तसेच गोरगरीब जनतेचा जाण्या येण्याचा खर्चसुद्धा वाचतो. या उद्देशाने लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येते. लोकन्यायलयात आपल्या केसेस निकाली लावायच्या असतात.
लोकन्यालयात एकूण १६१ मोटर वाहन कायद्याचे केसेस ठेवण्यात आल्यात. त्यात मुकूटबन पोलीस स्टेशनच्या ३० व पाटण पोलीस स्टेशनच्या १३१ केसेस होत्या. त्यापैकी ३६ केसेस निकाली लागल्या. संबंधितांना ३१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यवतमाळचे सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. जी बोधनकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे अॅड. मादीकुंटावार, अॅड काटकर, ठाणेदार धर्मराज सोनुने, पाटणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे होते. कामकाज पाहणीकरिता न्यायालयीन कर्मचारी तुळशिवार, दातारकर, भेदोडकर व थोडगे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता खुशाल सुरपाम, प्रदीप कवरासे, जितेंद्र पानघाटे, राम गडदे व महिला शिपाई रंजना सोयाम यांनी परिश्रम घेतले.