हिरापूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

700 पेक्षा अधिक रुग्णांनी केली तपासणी

0 252

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथे शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर रुग्णांना मोफत औषधींचे वाटपही करण्यात आले. 50 पेक्षा अधिक विविध वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट इत्यादींनी रुग्णांची तपासणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दुपारी 1 वाजता या शिबिराला सुरूवात झाली. या शिबिरात स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, बालरोग, अस्थीरोग, दंतरोग, नेत्ररोग, नाक कान घसा रोग, इत्यादी रोगांवर तपासणी व चाचणी करण्यात आली. सोबतच नेत्र आणि कानाच्या बहिरेपणावरही तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांवर केवळ औषधोपचाराचा खर्च घेऊन मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरात हिरापूर परिसरातील गावातील रुग्णांनी भेट दिली.

शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, डॉ. वीणा चवरडोल, सर्जरी तज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, हृद्यरोग व मधुमेहासाठी डॉ. गणेश लिमजे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, डॉ. दिलिप सावनेर, भूलतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुमनाके, डॉ. ठाकरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. अमोल पदलमवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीती खाडे, डॉ. पल्लवी पदलमवार, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले.

गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार – डॉ. लोढा
शिबिरात अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लक्षात आले. हे सर्व रुग्ण गरीब आहेत. त्यांना शस्त्रक्रियेचा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. केवळ औषधीचा खर्चा व्यक्तिरिक्त इतर कोणताही खर्च त्यांच्याकडून घेतला जाणार नाही.

 

Comments
Loading...