सण उत्सवाच्या काळात शांतता भंग कारणाऱ्यांची खैर नाही-एस.डी.पी.ओ.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांची चेतावणी

0

नागेश रायपुरे , मारेगाव : आगामी काळात येणाऱ्या सर्व धार्मिक सण, उत्सवादरम्यान जो गावातील शांतता भंग करणारे कृत्य करेल त्याची खैर नाही. पोलीस प्रशासनाकडून त्यांचा बडगा काढण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे पोलीस स्टेशन मारेगाव येथे पार पडलेल्या शांतता कमेठीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पोळा, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र या धार्मिक उत्सवादरम्यान जातीवाचक धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोसल मीडियावर पसरवू नये. इतर जाती-धर्मांचा आदर करावा. गणेशोत्सव,नवरात्रोत्सव मंडळांनी डी.जे.विरहित शांततेत पार पाडाव्यात. तसेच येणाऱ्या धार्मिक उत्सवादरम्यान गावात जो शांतता भंग करणारे जातीवाचक तेढ निर्माण करणारे कृत्य करताना आढळल्यास तसे तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावे. अशा काही सूचना उपस्थित तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, शांतता कमेटीचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसोबत पार पडलेल्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सूचना दिल्यात.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या बैठकीदरम्यान तालुक्यातील वीज, रस्ता, पाणी तसेच मारेगाव शहरातील गतिरोधकासमोरील पटटे, अवैध मनोरंजन क्लब, महामार्गावर असलेले मोकाट जनावरे आदी विषयांवर चर्चासुद्धा या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक होते. मंचावर ठाणेदार दिलीप वडगावकर, नायब तहसीलदार गौरकर, नगर पंचायत विभागाचे नगराध्यक्ष रेखा मडावी, अभियंता चव्हाण, वीज वितरणचे स.अभियंता तिरसुडे, साळुके, पंचायत समितीकडून संदीप वाघमारे, रमण डोये आदी विराजमान होते. तर तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, शांतता कमेटीचे सदस्य, तसेच गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळाचे शेकडो नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.