आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि वेशभूषास्पर्धा

बालकांच्या मोहक रूपांनी उपस्थितांना केलं मोहीत...

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबनच्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सामाजिक एकता व अंगी असलेले कलात्मक कौशल्य यावेळी दाखविले. शालेय विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडून व राधाकृष्णाच्या विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

याचवेळी शालेय प्रांगणात वेशभूषास्पर्धा वर्ग नर्सरी पासून के जि २ पर्यंतच्या विध्यार्थ्यांकरिता ठेवण्यात आली. स्पर्धेत जवळपास ९४ चिमुकल्यांनी सहभाग घेतला. त्या स्पर्धेमध्ये नर्सरीमधून प्रथम क्रमांक राधा-सेनिका भट तर कृष्ण प्रथम क्रमांक-अद्वित तावडे, के जी १ मधून राधा प्रथम क्रमांक-आराध्या जांभुळे तर कृष्ण प्रथम क्रमांक-विवान आसामवार तर के जी २ मधून प्रथम क्रमांक-राधा-आयुषी उपलेंचीवार तर कृष्ण प्रथम क्रमांक-दक्ष चटप यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे परीक्षक तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष लता गादेवार होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक म्हणून प्रा. कल्पना पवार , परीक्षक पारखी, दीप्ती गादेवार यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचे आयोजन निनांन चेरीयन यांनी केले. स्वागतगीत महेश यांनी गायिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नीलेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगन मालेकर आणि नीलेश राऊत यांनी केले. तर आभार रूपा बोलपेलवार यांनी मानले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक विशाल, उपेंदर रेड्डी, शिवानंद महाजन, आशीष, मनीषा, मोहसीना, वैशाली, निकिता, नेहा, संगीता, करिश्मा, दीक्षा, आम्रपाली, प्रतीक्षा आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.