नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना तालुका शाखा मारेगाव च्या वतीने बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी पंचायत समिती मारेगाव समोर विविध प्रलंबित मांगण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनास ग्रामसेवक युनियन तालुका शाखा मारेगाव यांनी आपला पाठींबा दर्शविला.
संगणक परिचालकांना प्रति महिना १५ हजार मानधन द्यावे. १४ व्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून द्यावे. एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ कालावधीतील थकीत मानधन तातडीने मिळावे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना च्या केलेल्या कामाचे वेगळे मानधन द्यावे. कसलीही नोटीस न देता कामावरुन कमी केलेल्या परिचालकांना परत कामावर घ्यावे. अशा विविध मागण्या संगणक परिचालकांच्या आहेत.
कामबंद आंदोलनात डिजिटल महाराष्ट्रात काम करणारे सर्व संगणक परिचालक असल्यामुळे २६ ऑगस्ट रोजी ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करून पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ट्विटर मोर्चा काढण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेऊन आंदोलन करून शासनापुढे अनेक प्रश्न मांडले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने संगणक परिचालक संघटनेद्वारे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी राहुल पोतराजे, अझर ख़ान, प्रज्योत कोल्हे, रवीन्द्र टोंगे, विशाल आत्राम, कालिंदी रायपुरे, बांदूरकर ताई, बोबडे ताई, सूरज मोहितकार, योगराज भोज, प्रफुल पारखी, देवानंद किनाके, सिद्धेश डवरे, सतीष डाहुले, विकास राऊत आदी तालुक्यातील संगणक परीचालक उपस्तित होते.