विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हास्तरीय मेळावा रविवारी
धनोजे कुणबी सभागृहात ८ सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन
विलास ताजने, वणी : वणी येथील धनोजे कुणबी सभागृहात (दि.८) रविवारला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी वि.मा.शि. संघाचे प्रांताध्यक्ष श्रावण बरडे राहणार आहे. अतिथी म्हणून वि.मा.शि. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, म.रा.मा.शि.महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष आनंद कारेमोरे, अमरावती विभागीय कार्यवाह एम.डी.धनरे, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, मेळावा निरीक्षक दिलीप कडू, गोविंद ठावरी, अशोक आकुलवार, श्यामसुंदर बोढे, कमलाकर चुंबळे, व्ही.बी.टोंगे, गंगारेड्डी बोडखे उपस्थित राहणार आहे.
सदर मेळाव्यात विविध प्रकारचे ठराव विचार विनिमय करून पारित करण्यासाठी मांडण्यात येणार आहे.
माजी प्रांतिक उपाध्यक्ष व्ही.बी.टोंगे यांचा अमृत महोत्सवी सत्कार होणार आहे. तसेच वणीच्या राजर्षि शाहू महाराज विध्यालयाचे शिक्षक तथा साहित्यिक गंगारेड्डी दशरथ बोडखे यांच्या ‘अंधारलेल्या वाटा’ या कथा संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन वि.मा.शि.संघाचे जिल्हाध्यक्ष अशफाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे, कार्याध्यक्ष मनोज जीरापुरे, सहकार्यवाह संजय देवाळकर, जिल्हा संघटक दिवाकर नरुले, वणी तालुकाध्यक्ष किशोर बोढे, भुपेंद्र देरकर, कार्यवाह दत्तू महाकुलकर, राजू जेनेकर, उपाध्यक्ष दिलीप गोहोकार, प्रकाश सिडाम, मारेगाव तालुकाध्यक्ष पंकज राठोड, ए.एम.खोके, कार्यवाह धनराज ठेपाले, पी.एम.म्हसे, उपाध्यक्ष पद्माकर एकरे, ए.डी.पेचे, झरी तालुकाध्यक्ष मोहन पडलवार, कार्यवाह पुरुषोत्तम घाटे आदींनी केले आहे.
यशस्वीतेसाठी रवींद्र गोखरे, प्रमोद थेरे, सुनील लखमापुरे, अशोक काळे, मोतीराम परचाके, प्रतीश लाखमापुरे, वंदना शंभरकर, नत्थू जेऊरकर, पांडुरंग वैद्य, उमाकांत म्हसे, प्रितेश लखमापुरे, धनराज काथवटे, राजश्री गोखरे, विठ्ठल पडलवार, अशोक पालावार, पवन निब्रड, गजानन टेंभुर्डे, दौलत घुगूल, सुरेंद्र इखारे, संतोष बेलेकार, बबन लखमापुरे, कृपाल खरचड, गजानन देवाळकर, सुषमा निब्रड, सुरेंद्र बुच्चे, रोहन मोडक, सोनाली कोंडेकर, लिलाधर चौधरी, प्रवीण खंडाळकर, पी.के.जोगी, ए.एस.बोढे, जयश्री राजूरकर, बी.एम.राठोड, एस.पी.आस्वले, के.ए.ढुमने, एस.वाय. घोडमारे, जी.बी. बोनतलवार आदी परिश्रम घेत आहेत.