बालकलावंत स्वरा ठेंगडी हिचे शिवचरित्रकथन एक ऑक्टोबरपासून
जैताई देवस्थानामध्ये दि. १ ते 6 ऑक्टोबर पर्य॔ंत सुश्राव्य कार्यक्रम
बहुगुणी डेस्क, वणी: येथील जैताई देवस्थानमध्ये दि. 1 ते 6 ऑक्टोबर पर्य॔ंत सुश्राव्य कार्यक्रम होतील. यामध्ये दि. 5 ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री 8 वाजता नागपूर येथील बाल कलावंत कु. स्वरा राहुल ठेंगडी हिच्या शिवचरित्रकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ती 7 व्या वर्गात शिकत असून तिचे वय 13 वर्षे आहे. आपल्या 90 मिनिटांच्या शिवचरित्रकथनाने ती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असते. वक्तृत्व स्पर्धेतील अनेक पारितोषिके तिने प्राप्त केलीत. शालेय अभ्यासातील तिची प्रगति अभिनंदनीय आहे.
शिवाजी महाराजांचे बहुतांशी महत्वाचे किल्ले तिने पाहिले व अनुभवले आहेत. “रायगडाला जेव्हा जाग येते ” या नाटकातील तिच्या संभाजी या व्यक्तिरेखेला एकपात्री अभिनयस्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. शिवचरित्रकथनाचे तिचे आता पर्यंत 22 कार्यक्रम झालेत. तिच्या या कार्यक्रमाबद्दल केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिचा नुकताच सत्कार झाला . स्वरा ही नागपूर मधील ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर ठेंगडी यांची नात होय.