शामादादा कोलाम समाज संघटना गठीत

झरी तालुक्यात आदिवासी समाजाला बळकट करण्याचे उद्देश

0

सुशील ओझा, झरी: शामादादा हे गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुख दुःखात मदत करणे मुलामुलींचे लग्न करून देणे व इतर सामाजिक कार्य करून समाज एकत्र ठेवण्याचे कार्य करत होते. त्यांना प्रेरित होऊन तालुक्यात तरुण युवक एकवटले असून कार्यकारणी गठीत करण्यात आली.

तालुक्यातील पाटनाई येथील देवस्थानच्या सभागृहात कोलाम समाजाची सभा झाली. सभेत समाजाच्या विकासात्मक धोरण, समाज मजबुती व आर्थिक मजबुती करण्याच्या उद्देशाने वणी, मारेगाव, झरी, तेलंगणा, पांढरकवडा येथील युवा पिढी उपस्थित होती.

संघटनेचे अध्यक्ष नानाजी टेकाम, उपाध्यक्ष गंगाराम आत्राम, सचिव बालू टेकाम, कोषाध्यक्ष किशोर मेश्राम, विठ्ठल आत्राम, प्रकाश जुनघरी, लक्ष्मण टेकाम, पांडुरंग टेकाम, विनोद मडावी, विलास आत्राम, तुळशीराम मडावी यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.