15 दिवसानंतरही आशा सेविकांच्या आदोलनाकडे दुर्लक्ष
मंगळवारी संजय देरकर यांनी घेतली आशा सेविकांची भेट
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मानधन वाढीसाठी 3 सप्टेंबरपासून राज्यभरातील आशा सेविका संपावर गेल्या आहेत. राज्यभर त्यांनी मानधन वाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. मारेगाव येथे ही हे आंदोलन सुरू आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आशा सेविकांना तिप्पट मानधन देणार असे जाहीर केले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे आशा सेविकांनी आंदोलनाचा पावित्रा उचलला आहे. दरम्यान मंगळवारी आशा सेविकांची संजय देरकर यांनी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आशा सेविकांना सध्या कामावर आधारीत मोबदला धरून सरासरी 2500 हजार रुपये मानधन दिले जाते. तर गटप्रवर्तकांना टीए व डीए पकडून 8724 रुपये मासिक मानधन दिले जाते. हे मानधन अत्यंत अल्प आहे. आशा सेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या मानधनात तिप्पट वाढ करावी अशी आशा सेविकांची मागणी आहे. दरम्यान या आंदोलनाला संजय देरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट दिली. यावेळी त्यांनी आशा सेविकांशी संवाध साधला. यावेळी ते म्हणाले की…
आशा सेविकांना दिले जाणारे मानधन हे द्रारिद्रयरेषेखालील असून किमान वेतनाखाली ही आहे. त्यामुळे हा आशा सेविकांवर अन्याय आहे. त्यांना वेठबिगारासारखे वागवले जाते. जोपर्यंत आशा सेविकांना शासकीय सेवेत कायम केले जात नाही तोपर्यंत त्यांना किमान अंगणवाडी सेविकेएवढे तरी मानधन दिले जायला पाहिजे अशी मागणी यावेळी संजय देरकर यांनी केली.
यावेळी संतोष कुचनकर, प्रा. लाव्हाळे, जितू नगराळे, गजू दुर्गे यांच्यासह तालुक्यातील गावातील आशा सेविका उपस्थित होत्या.