सुशील ओझा, झरी: येथे गोंडी कोया पुणेम महासभा झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रा. राजू तोडसाम उपस्थितीत होते. कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने आदिवासी कलाकारांनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितीत आदिवासी बांधवांना आमदार तोडसाम यांनी मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य सरकार आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. मागील सरकारच्या काळात विकासकामे झाली नाहीत. ती भाजपा सरकारने केलीत. त्यांनी स्वतः सभागृहात बोगस आदिवासींच्या मुद्द्यांवर आवाज उठविला. तेव्हा त्यांच्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. असं तोडसाम यावेळी म्हणाले.
हे सर्व आपल्या सरकारमुळे शक्य झाले. तसेच समस्त आदिवासी बांधवांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बोलीभाषेचा जास्त वापर करावा. आपल्या संस्कृतीचे जतन करावे. असेही यावेळी आमदार यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विकास कुडमथे, भाऊराव मरापे, वरखडे, नामदेव किनाके, अविनाश कुडमथे, मनोहर कोटनाके, नागोराव गेडाम, सागर मडावी, डाॅ. संदीप, आत्राम, करण कुडमथे, रमेश धुर्वे, आत्राम, दिनेश सुरपाम, विठ्ठल मेश्राम, पंकज राठोड, शेखर जयस्वाल व इतर पदाधिकारी तथा हजारोच्या संख्येने आदिवासी बंधु-भगिनी उपस्थितीत होते.