परमडोहच्या नीलेश सपाटेंना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार
गुरुजींच्या यशाने विध्यार्थीही आनंदले
वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरकाराने दि.२२ रविवारला सोलापूर येथे गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राथमिकचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे अध्यक्ष दिलीप सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सपाटे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या वतीने महाराष्ट्रातील उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. यासाठी राज्यातील पंचवीस शिक्षकांची निवड झाली होती. विशेष म्हणजे सदर पुरस्कारासाठी पात्र ठरलेले नीलेश सपाटे हे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव शिक्षक आहे. वणी पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, गटविकास अधिकारी राजेश गायनार, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, विस्तार अधिकारी लक्ष्मण इद्दे, सरपंच संदीप थेरे, मुख्याध्यापक हंसराज काटकर आणि ग्रामस्थांनी उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांचे अभिनंदन केले.
|
|