झरी येथील सार्वजनिक नाल्यांत अळ्यांचा संचार

ग्रामवासींयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

0

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत मुख्यमार्गासह गावातील रस्त्याकडेला गावातील व मार्गावरील मोठ्या नाल्यांची कामे झालीत. परंतु बहुतांश नाल्यांतून पाणी वाहत नसून नालीतच पाणी साठून असल्याने नालीतील पाण्यात लाखोंच्या संख्येने अळ्या जमा झाल्या आहेत. तसेच डासांचा हैदोस वाढला असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्टँड चौकटीतील सार्वजनिक नालीच्या दोन्ही बाजूंना चाय टपरी, नास्ता हॉटेल, भाजीपाला तसेच औषधी दुकान आहे. सार्वजनिक नालीत असलेल्या अळ्या बघण्याकरिता अनेकांनी गर्दी केली होती.

नालीचे दूषित पाणी रस्त्यावर येत असल्याने जनतेच्या पायाने घरात जाऊन रोगराई पसरण्याची शंका बळावली. या गंभीर बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. झरी येथील बसस्थानकावर नगरपंचायत कडून सार्वजनिक शौचालय बनविण्यात आले. परंतु शौचालयता मध्ये पाणीच नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. तर पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. आधीच वातावरणाच्या बदलाने जनतेची आरोग्य धोक्यात आले आहे. सर्दी, ताप, मलेरिया, डेंगू, खोकला व इतर आजारांनी जनता त्रस्त असताना गावातील गंदगीने आजारात पुन्हा भर पडली आहे.

जनतेच्या आरोग्याचं नगरपंचायतीला कोणतेही सोयसुतूक नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सत्ताधारांच्या विरोधात फक्त तक्रारी देऊन आंदोलन व उपोषणाचे इशारे देण्यात आले परंतु जनतेकरिता कोणतेही ठोस पावले उचलण्यात नाही आले ज्यामुळे विरोधकही फक्त तक्रारी पर्यंतच सीमित असल्याचे दिसत आहे.

झरी हे तालुक्याचे ठिकाण असून सर्वच कार्यालय असून हजारो लोक कार्यालयीन कामकाजकरिता येतात .पंचायत समितीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर कार्यजवळच मोठे खड्डे पडून पाणी साचले आहे त्यामुळे दुचाकी तर सोडा साधे पायी जाणे कठीण झाले आहे. परंतु त्या ठिकाणी साधे मुरूम टाकून बुजविण्याचे सौजन्यसुद्धा दाखविले नाही. ज्यामुळे नगरपंच्यायत विरुद्ध जनतेत रोष व्यक्त होत आहे.

ग्रामपंचयातीचे रूपांतर नगरपंचायत होऊन चार वर्षं लोटूनही गावाचे विकास कोसो दूर आहे. नगरपंचायत मध्ये विकास सोडून तक्रारी ,उपोषणाची मालिका, नाली बांधकाम व रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे एकमेकांवर आरोपातच चार वर्षे लोटून गेले. आदिवासी बहुल तालुक्यातील नगरपंचायत असून शासनाकडून नगरपंचायतला विकास कामाकरिता विशेष निधी प्राप्त होतो निधी प्राप्त होऊनही विकासकामे अजूनही झाले नाही. उलट स्वतःच्या स्वार्थकरिता व राजकारण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे काम करण्यात आले. जनतेच्या आरोग्य व गावाच्या विकासाकडे नगरपंच्यातने कोणतेच लक्ष न दिल्याची ओरड जनता करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.