क्रांती युवातर्फे संचारबंदीत मदत केंद्र

गरजूंनी जीवनावश्यक वस्तू, औषधी इ.साठी संपर्क साधण्याचे आवाहन

0

बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीनंतर आता संचारबंदीही लागू झाली आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी क्रांतीयुवा संघटनेतर्फे जिवनावश्यक वस्तू, औषधी, रुग्णवाहिका इत्यादींची सेवा देण्यात येणार आहे. क्रांतीयुवा सेनेचे कार्यकर्ते ही सेवा घरपोच देणार आहे. त्यामुळे कुणालारही घराबाहेर पडण्याची गरज नाही.

गोरगरीब, निराधार, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विधवा, गरोदर, तसेच गरजुंना जीवनावश्यक वस्तू आणि औषधींची गरज पडते. तसेच वृद्ध आणि गरोदर महिलेला घराबाहेर पडणे शक्य नसते त्यामुळे त्यांना घरपोच मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा यांनी केले आहे,

अधिक माहितीसाठी राकेश खुराणा मो नं 9922161616, जम्मू मो नं 70387 86786, निलेश कटारिया मो नं 94228 65788, राजू गव्हाणे मो नं 97642 53253, कपिल जुनेजा मो नं 9970073162, दीपक मोरे मो नं 95183 39235 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.