जब्बार चीनी वणी: मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगोलर आदी ठिकाणी शिक्षणासाठी असलेले तरुण तसेच परराज्यातून यात्रा करून परतलेल्या वणी येथील जवळपास 352 जणांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिलेला आहे. मात्र त्यापैकी अनेक जण सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत. झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील नायिकेचा मी मिरवणार, सगळ्यांची जिरवणार हा डायलॉग फेमस झाला आहे. संबंधित लोक शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करत आहेत. खरबरदारी न घेता आजाराला निमंत्रण देऊन त्या फेमस डायलॉगची अनुभूती गावाला घडवणार तर नाहीत ना ? असा प्रश्न नागरिकंना सतावू लागला आहे.
कोरोना विषाणूची लागण जगात झपाट्याने होत आहे. भारतातही हा आजार झपाट्याने फैलावण्यास सुरूवात झाली असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत महाराष्ट्र सरकारने राज्यात व नंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाउन जाहीर केला. महाराष्ट्रात संचारबंदीही लागू केली गेली. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. घराच्या बाहेर कोणीही पडायचे नाही. असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही वणी शहरात संध्याकाळी अनेक कॉलोनी व वार्डात ठीक ठिकाणी लोकांच्या झुंडीच्या झुंडी बसलेल्या दिसत आहेत.
सहाशे पेक्षा अधिक जण होम क्वारंटाइन
कोरोना फैलावलेल्या मुंबई , पुणे व इतर शहरांतून आलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत व वणी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचा यांनी होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे . आरोग्य विभागाने 648 जणांची यादी तयार केली असली तरी तालुक्यात असे एक हजार पेक्षा पेक्षा अधिक नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे . बाहेरून आलेल्या स्थानिक यात्रेकरूनांही होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे . मात्र, यातील अनेक जण सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे.
ग्रामीण भागातही तपासणी न करणारे अऩेक
जी व्यक्ती कोरोनाबाधित शहरांमधून आली आहे. त्यांनी आधी रुग्णालयात तापसणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी 14 दिवस होम कॉरन्टाईन राहण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ग्रामीण भागात आलेले काही सुशिक्षित लोकही याकडे दुर्लक्ष करीत आहे व सर्सास फिरताना दिसत आहे.
चीनमधून सुरू झालेला कोरोना हा आजार सातासमुद्रापार इटलीमार्गे आपल्या देशात कधी फैलावला हे कळले नाही . तेव्हा पुणे मुंबईतून तो गावाच्या वेशीवर कधीही धडक देईल, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरात बसवत नाही म्हणून सार्वजनिक ठिकाणी बसण्याची वणी तील काही लोकांची ही सवय म्हणजे विषाची परीक्षा पाहण्यासारखी असल्याचे मत सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.