वकिलाची महिला वाहतूक शिपायाशी अरेरावी, गुन्हा दाखल

अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप

0

वणी: शहरातील एका वकीलानं एका महिला वाहतूक पोलीस शिपायाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वकिलाचं नाव सूरज महारतळे आहे. महिला शिपायानं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सूजर महारतळेला ताब्यात घेतलं आहे.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खाती चौक,व पुढे गांधी चौक मार्गे गाडगेबाबा चौकावर एकेरी वाहतूक आहे. त्यानुसार चौकाचौकात वाहतूक शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारला जिल्हा वाहतूक उपशाखा वणी येथे कार्यरत असलेली प्रगती जुमनाके ही महिला शिपाई कर्तव्यावर होती. दरम्यान सूरज महारतळे यांनी एकेरी वाहतुकीचे उल्लंघन करीत दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला.

सूरज महारतळे यांना महिला वाहतूक शिपायानी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सूरज महारतळे यांनी अरेरावी भाषा वापरील. मी हायकोर्टाचा वकील असल्याचं सांगत त्यांनी महिला शिपायाचा हात पकडून तिला मारहाण केली. असा आरोप महिला शिपाईनं केला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार महिला पोलीस शिपाई प्रगती जुमनाके हिने वणी ठाण्यात नोंदविली. त्यावरून सूरज महारतळे विरुद्ध महिला वाहतूक पोलिसांशी अरेरावी करीत मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी, तसेच मुंबई मोटर एकेरी वाहतूक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर सूरज महारतळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

(DJ वाजविणा-या गणपती आणि दुर्गोत्सव मंडळावर पोलिसांची करडी नजर)

मात्र या प्रकाराबद्दल एक वेगळी चर्चा ही वणीत होत आहे. हा प्रकार म्हणजे प्रकार एक षड्यंत्र असल्याचा आरोप काही लोकांकडून करण्यात येत आहे. सध्या या घटनेचा तपास ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात पीएसआय दुर्गालाल टेंभरे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.