वणीत विनाकारण फिरणा-या वाहन चालकांवर कारवाई

41 वाहनं जप्त, विनाकारण फिरणा-यांना धास्ती

0

विवेक तोटेवार, वणी: आज सायंकाळी वणी पोलिसांनी वणीत विनाकारण फिरणा-या लोकांवर कारवाई केली. टिळक चौकात झालेल्या या कार्यवाहीत वणी पोलिसांनी जवळपास 41 दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. कारवाई करणा-यांचे वाहन पोलिसानी जप्त करत पोलीस ठाण्यात लावले. पुढील आदेश येथपर्यंत सदर वाहन सोडण्यात येणार नसल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांनी दिली.

सध्या वणीत जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. मात्र संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून काही लोक विनाकारण गाडीने फेरफटका मारत होते. त्यातच आज लोकांनी जत्रा मैदावन आणि मंडईत विनाकारण गर्दी केली. लोक ऐकत ऩसल्याने अखेर पोलिसांनी वाहन जप्तीची कारवाई केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.