मुकुटबन येथील तलावातील शेकडो मासे मृत
भोई समाजातील २५० कुटुंबाचे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
सुशील ओझा, झरी: सध्या मुकुटबन येथील मामा तलावात मासे मरून पाण्यात तरंगत आहे. तर काही मासे तलावाच्या किनाऱ्यावर आले आहेत. त्यामुळे भोई समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे मच्छीमारी बंद असून मासे विक्रीसुद्धा बंद आहे. लोकांना मास मच्छी मिळत नसल्याने कुणी विषारी औषध टाकून तर मासेमारी केली तर नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. तर काही भोई समाज उन्हाळ्यात पाणी गरम झाल्याने मच्छी मरण पावल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे. तलावात विविध प्रकारचे ४ ते ५ किलोग्रामचे मासे असून मासेमारी बंद असल्याने चिंता केल्या जात आहे.
मुकूटबन येथील मामा तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव या तलावाच्या भरवश्यावर गावातील जवळपास २५० कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. या तलावातील शिंगाडा संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणात प्रसिद्ध आहे. मासेविक्री बंद होताच शिंगाड्याची लागवड केली जाते. शिंगाडा व मासेविक्रीच्या भरवश्यावर भोई समाजाच्या शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मासेविक्री बंद मुळे मस्त्य सहकारी सोसायटीचे सुद्धा नुकसान होत आहे.