व्यापारी असोसिएशनच्या रक्तदान शिबिरात 200 लोकांचे रक्तदान
वणीतील श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आले होते शिबिर
जब्बार चीनी, वणी: व्यापारी असोसिएशनतर्फे आज वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वणी येथील श्री राम मंदिर खाती चौक येथे सकाळी 9 ते सं. 6 दरम्यान हे शिबिर घेण्यात आले. नागपूर येथील जीवणज्योती रक्तपेढी यांच्या टीमच्या मार्गदर्शनात हे शिबिर झाले.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपत आला आहे. प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी सरकारने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार व्यापारी असोसिएशनने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जीवनज्योती रक्तपेढीचे डॉ. अनिल नामपल्लीवार, किशोर खोब्रागडे, अरुण मोरांडे, संदीप लाओल यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांनी देखील या शिबिराला भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, उपाध्यक्ष राजू गुंडावार, सचिव अनिल आक्केवार, कोषाध्यक्ष लवलेश लाल, सहसचिव संजय पांडे, कार्यकारिणी सदस्य किशन खुंगर, रमेश येरने, रवि निखार, दीपक छाजेड, भगवान तारुणा, अनुज मुकेवार यांच्यासह निलेश कटारिया, दीपक दीकुंडवार, गौरीशंकर खुराणा, कपिल जुनेजा, श्याम ठाकरे, जमीर खान, आतिष बुरेवार, अमन कुल्दीवार, अविनाश भुजबलराव, सुनील चिंचोळकर, विशाल किन्हेकार, धनू भोयर, बबलू अहेमद यांनी परिश्रम घेतले..