महिला शिपायाला मारहाण प्रकरण: षडयंत्र की आणखी काही ?

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

0

वणी: शहरातील सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या वकीलावर नियमाचं उल्लंघन करीत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपायाला अश्लील शिवागाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे वकिलाविरोधात असलेलं एक षडयंत्र असल्याच्या पोष्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण म्हणजे एक षडयंत्र तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सूरज महारतळे असं गुन्हे दाखल झालेल्या वकिलाचं नाव असून सूरज हे शहरातील विविध सामाजिक कार्यात सहभागी राहतात. तसंच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यातील सहभागासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. जेव्हा सूरज महारतळे यांच्याविरोधात महिला वाहतूक पोलीसासोबत असभ्य वर्तन करून मारहाण केल्याचा आरोपावरून पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या संदर्भात सोशल मीडियामध्ये हे एक षडयंत्र असल्याच्या पोस्ट पोष्ट व्हायरल करण्यात आल्या. त्यात पोलिसांनी षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.

सूरज महारतळेंना नुकताच समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान

सामाजिक कार्यात अग्रेसर राहून अनेक क्षेत्रात पुरस्कार मिळविणारे तसेच धनोजे कुणबी विकास संस्थेने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ६ ऑगस्टला पार पडलेल्या या कार्यक्रमात सुरज महारतळे यांना मानचिन्ह सुद्धा देण्यात आले होते. नावारूपास आलेल्या या वकीलावर गुन्हे दाखल झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या निमित्तानं विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. याबाबत वणी बहुगुणी.कॉमने काही प्रश्न उपस्थित केले आहे.

ज्या महिला पोलीस शिपायानं तक्रार दाखल केली आहे त्या प्रगती जुमनाके या मितभाषी म्हणून परिचित आहे. आजवर या महिला शिपायाविरोधात कोणतीही तक्रार नाही. तसंच कर्तव्यात कसूर ठेवल्याचा कोणता आरोपही त्यांच्यावरही नाही. त्यामुळे त्यांनी खरच सूरज महारतळे यांना षडयंत्र रचून अडकवण्यात आलं का? तसंच जर खोटे गुन्हे किंवा षडयंत्र असेल तर यामागे कुणाचा हात आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

यासंबंधी वणी बहुगुणीनं काही प्रश्न उपस्थित केले आहे.

  • एकेरी वाहतूक असतांना सुरज महारतळे हे राँग साईडने का जात होते.
  • महारतळे जर स्वतः वकील आहे, त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. त्या मार्गाने एकेरी वाहतूक आहे हे माहिती असताना, एकेरी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ते गेले कसे ?
  • जर त्यांच्याकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन झाले होते तर त्यांना वाद का घातला ?
  • नियम मोडला तर दंड भरून प्रकरण निपटले असते मात्र असे न होता सूरज यांनी हायकोर्टाचा वकील असल्याचा उन्माद सदर शिपायाला दाखविला असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. यात ते वकील असण्याचा संदर्भ का देण्यात आला ?
  • कायद्याचे सखोल ज्ञान असलेले तसेच पुरस्कार प्राप्त वकिलाने पुरस्कार मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. हा प्रकार उन्मादातून झाला की प्रसिद्धीच्या ओघातून? हे एक कोडंच आहे?
  • सदर प्रकरणाची सुरुवात ही एकेरी वाहतुकीचे नियम तोडून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. जर त्यांनी एकेरी वाहतुकीचा नियम तोडला नसता तर हा प्रकार झाला असता का ?

सध्या सोशल मीडियामध्ये हा प्रकार षडयंत्र असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे. पण या प्रकरणात उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांमुळे हे षडयंत्र आहे की आणखी काही हे एक कोडं बनलं आहे.

(हे पण वाचा:वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.