कोडपाखिंडी व वल्हासा येथे धान्य व किराणा वाटप

गरीब निराधार व विधवा, परितक्ता महिलांना मदत

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे मांगुर्डा येथील सृजन संस्थाच्या वतीनेगावातील विधवा परीतक्त्या व गरीब महिलांना अत्यावश्यक वस्तू वाटण्यात आल्या. यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, २ कीलो साखर, २ किलो तेल, २ किलो आलू, २ किलो कांदे, १ किलो तूर डाळ, १ पाव हळद व २ साबण अश्या वस्तू प्रत्येकी महिलेला वाटप करण्यात आल्या. यावेळी अन्नधान्य वाटप सृजन संस्थेचे शुभ दोडके, समाजसेविका दुर्गताई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस गावकरी व सामाजिक कार्यकर्ते बाळु टेकाम, महेश गेडाम, नितेश खडसे, अरविंद खडसे, योगिता अर्के, वासुदेव कोडपे उपस्थित होते.

वल्हासा पोड येथे गरीब निराधार अपंग कुटुंबांना १ क्विंटल तांदूळ व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. महात्मा फुले जयंती निमित्त निर्मिती बहुउद्देशीय संस्था वणी व सेतू सुविधा झरी केंद्रा तर्फे हे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते दयानंद न्याहारे व गावकरी सन्मानिय मंडळी उपस्थित होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलिप भोयर व सेतू सेवा केंद्राच्या सुकेशनी मारोती आसुटकर यांच्यासह तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर व विजय मत्ते तसेच दयानंद न्याहारे व गावकरी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.