जब्बार चीनी, वणी: महावितरणच्या घरगुती, वाणिज्य बिलासह इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले आहेत. सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत: रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीज बिल दिले जाणार आहे.
आता मार्चचे बिल भरण्यासाठी 15 मे तर, एप्रिलचे वीजबिल भरण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ‘कोरोना’ मुळे 22 मार्च ते 3 मे पर्यत लॉकडाऊन जाहीर झाले आहे. याकाळात महावितरणने 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे मीटरचे रीडिंग घेणे बंद केले आहे. सोबतच वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. वीज बिल भरणा केंद्र बंद आहे. तथापि, महावितरणच्या कन्जुमर पोर्टलवरुन किंवा मोबाईल अॅपमधील लॉगीन द्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे.
वीज ग्राहकांनी स्वत: च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग ) पाठवावे, असा एसएमएस मोबाइलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे. वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार बिल देणे शक्य होणार आहे. जे ग्राहक स्वत: चे मीटर रीडिंग पाठविणार नाही. त्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात येईल
महावितरण च्या 9930399303 या क्रमांकावर एसएमएस व्दारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर स्पेस बारा अंकी ग्राहक क्रमांक अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24 तास सुरू असणा_या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत किंवा महावितरण मोबाईल अॅपव्दारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
याशिवाय वीजग्राहकांसाठी महावितरण मोबाइल अॅपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचे स्वत:चे अनेक वीजबिल पाहणे व त्यांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग , क्रेडिट डेबिट कार्डासह मोबाईल बॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध आहे. तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. हे मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून अन्ड्रॉईड विंडोज व आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड होईल, अशी सुविधा आहे.
ऍप डाऊनलोड करण्यासाठी लिंक…
https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app&hl=en_IN