संचारबंदीचे उल्लंघन करणा-या 25 जणांना शिक्षा
2 हजारांचा दंड, याआधी 20 जणांना झाली होती शिक्षा
वणी बहुगुणी डेस्क: संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणा-या 25 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 2 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 10 दिवसाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या आधी न्यायालयाने अशाच प्रकरणात वणीतील 20 जणांना शिक्षा ठोठावली होती. वणी प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश के. के. चाफले यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
वणी शहरात पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणा-या पान टपरी चालक, भाजी विक्रेते इ वर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच संचारबंदी दरम्यान खर्रा, चहा विक्रेतेे अशांवर कारवाई करीत आहे. अशा प्रकरणात आतापर्यंत 45 लोकांना शिक्षा झाल्याने काही प्रमाणात यावर आळा बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय विनाकारण संचारबंदीचे उल्लंघण करणारे दुचाकीस्वार, विनाकारण फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे, ऑटोचालक इत्यादींवर संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घटनास्थळावरच कारवाई केेेेली जात आहे. त्यांच्यावर नगदी दंड आकारला जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने संपुर्ण राज्यात संचारबंदी घोषीत केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पंरतु सोशल डिस्टंसींग व संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्या करीता व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय शासना समोर असल्याने संपुर्ण शहरात संचारबंदी लावून नागरीकांना घरीच राहण्याचा सल्ला सर्वचस्तरांतुन देण्यात येत आहे. मात्र तरीही त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.