संभाजी ब्रिगेडतर्फे गरजूंना धान्य वाटप

लोकसहभागातून गोळा केले 10 पोते धान्य

0

सुशील ओझा, झरी: देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे असंख्य मोलमजुरी करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू नागरिकांसाठी अडेगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गावात धान्य गोळा करून गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला.

गावातील संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना धान्याचा माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर लोकांनी प्रतिसाद देत एका दिवसात पाच पोती गहू, चार पोती तांदूळ, आणि दाळ असे दहा पोती अनाज गोळा केले. यांचा उपयोग गावातील व परिसरातील रेशन न मिळणाऱ्या गरजू लोकांकरिता होणार आहे.

कोरोनाच्या संकटातही गावकरी धावून आल्याने गावकऱ्यांनी लोकांप्रती आपले दायित्व सिद्ध करून दाखवले आहे. त्या बद्दल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त करण्यात आले. अडेगाव- मुकूटबन परिसरात बाहेर गावातुन आलेला मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या व गावातील गरजू लोकांना गहू, तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ, हळद व साबण इत्यादी जीवनावश्यक वस्तूची किट बनवून गरजूंना वाटप करण्यात आले.

यासाठी नितेश ठाकरे, देव येवले, प्रशांत बोबडे, पुरुषोत्तम आसुटकर, शंकर झाडे, विजय भेदूरकर, संजय आसुटकर, अशोक पानघाटे, केतन ठाकरे, गजू झाडे, सुरेश धोटे, आशिष झाडे, गौरव धोटे, संदीप आसुटकर, मंगेश झाडे, संदीप येवले, उमेश शेरकी, विवेक सोनटक्के, दीपक हिरादेवे, राहुल हिवरकार,सुरेश गौरकार, संजय पावडे, प्रमेश येवले, शुभम राऊत, दीपक पाल, श्रीराम थेरे, दिलीप पाचभाई, अमोल गौरकार, मंगेश चिंचुलकार,अतुल काळे, अक्षय ठुनेकार, प्रशांत चौधरी, सचिन मलवडे, महेश पाल, स्वप्नील पानघाटे, विश्वजित डोहे, सारंग आसुटकर, अनोज चामाटे, सुरज हिवरकार, आणि इतर कार्यकर्ते व गावकरी हजर होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.