पोलिसांना मिळणार फेस प्रोटेक्शन किट

पतीच्या वाढदिवसानिमित्त डॉ. वैशाली गोफणे यांचा उपक्रम

0

निकेश जिलठे, वणी: देशात कोविड -19 चा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रात हा आकडा सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन वणी येथील डॉ. वैशाली गोफणे यांनी त्यांचे पती डॉ. विवेक गोफणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना फेस प्रोटेक्शन किट वाटप करण्याचा संकल्प केला आहे. लवकरच 50 सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार असून विशेष म्हणजे ही किट वणीतीलच एका तरुणाने तयार केली आहे.

संचारबंदीत कायदा व सुरक्षा यासोबत सुरक्षीत अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र झटत आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला असतानाही रखरखत्या उन्हात पोलीस कर्मचारी गस्त देत आहे. आहे त्या सुविधामध्ये ते कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्यामुळे वेदा क्लिनिकच्या संचालिका डॉ. वैशाली गोफणे यांच्या तर्फे वणी पोलीस ठाण्यातील 50 पोलिसांना फेस प्रोटेक्शन किट भेट दिली जाणार आहे.

वणीतील तरुणाने तयार केली कीट
सध्या फेस प्रोटेक्शन कीट बेळगाव मध्ये तयार होते. मात्र या किटची मागणी अचानक वाढल्याने या किटचा शॉर्टेज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ही किट कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना या किट पुरवण्यात आलेल्या नाही. अखेर ही बाब लक्षात घेऊन वणीतील रविनगर येथील रहिवाशी असलेल्या अमोल पोटे या तरुणानेच ही किट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला व त्यांनी स्वतः ही किट तयार केली.

पोलिसांना फेस संरक्षण किटची गरज – डॉ. वैशाली गोफणे
पोलीस कर्मचारी सध्या दिवसरात्र एक करून जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे त्यांना आम्हा डॉक्टरांचीही थोडी मदत व्हावी या उद्देशाने आम्ही फेस प्रोटेक्शन किट पुरवली जाणार आहे. माझे पती डॉ. विवेक गोफणे यांचा 25 एप्रिलला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने याचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय उन्हाळ्याचे दिवस बघता पीपीई किट घालून बाहेर काम करणे शक्य नाही. त्यामुळे फेस प्रोटेक्शन किट देण्याचे आम्ही ठरवले. मास्क पेक्षा फेस प्रोटेक्शन किट ही अधिक सुरक्षीत आहे. – डॉ. वैशाली गोफणे, वेदा क्लिनिक वणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.