विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गटई कामगारांना शासकीय मदत व गटई दुकानदारांना एका ठराविक वेळेत दुकान लावण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) व संत रविदास महाराज चर्मकार युवा मचं वणी तर्फे वणी विधानसभाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले.
चामडयाच्या जुन्या वस्तू व पादत्राणे दुरूस्तीचे काम करणाऱ्या. व्यक्तींना गटई कामगार म्हणतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पूर्ण देशभर लॉकडाऊन लावले. त्यामुळे गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनातर्फे या कामगारांना आर्थिक मदत देऊन ठराविक काळात दुकान सुरु करण्याची मुभा द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, पुरड शाखा प्रमुख प्रवीण डूबे, राजकुमार खोले, राहुल भटवलकर व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचचे सदस्य निकेश बावणे, रामदास खोले, मिलिंद पिंपळकर, किशोर हांडे, युवराज वाडेकर, पंकज वादेकर, विनोद ढेरे, किशन कोरडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.