बाजार भरला… परवानगी नसलेली दुकानेही उघडली

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, स्थानिक प्रसासन ढिम्म....

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता शहरी व ग्रामीण भागातील दुकाने उघडण्याबाबतच यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी नवीन आदेश निर्गमित केले. त्यानंतर आज सकाळी वणी बाजार पेठेतील सर्वच दुकाने उघडल्यामुळे बाजारात ग्राहकांची एकच गर्दी झाली. विशेष म्हणजे प्रशासनाकडून परवानगी नसलेली दुकानेसुद्धा उघडलेली दिसली. मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कार्यवाही केली नाही.

कोरोना महामारीमुळे मागील दीड महिन्यापासून सुरू लॉकडाउन पासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरी व ग्रामीण भागातील सलून, पान सेंटर व चहा दुकाने सोडून इतर दुकानांची तीन वर्गात विभागणी करून आठवडाभरात आळी पाळीने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली.

सोमवारी वणी येथील टिळक चौकातील प्रसिद्द पान सेंटरसह हॉट चिप्स दुकानही उघडून होती. शहरात इतरही अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग व वेल्डिंग दुकाने, मिष्ठान व नमकीन, गिफ्ट सेंटर, पान सेंटर, फोटो स्टुडिओ, बॅनर प्रिंटिंग दुकान, मोबाईल श़ॉपी सर्रास उघडलेली होती.

 

प्रशासन ढिम्म….
जवळपास सर्वच व्यवसाय सुरू असल्यामुळे बाजारात ग्राहकांची तौबा गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडल्याचे चित्र पहावयास मिळाले. एकाच वेळी सर्वच दुकाने उघडणार म्हणून प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली दिलली नाही. आता उद्या परवानगी नसलेल्या दुकानावर प्रशासन कार्यवाही करणार का दिसून येईल.

कोणत्या दिवशी कोणत्या दुकानांना परवानगी?
जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार कापड, अंडरगारमेंटस, मैचिंग सेंटर, फूट वेअर, लॉन्ड्री, कुशन व कर्टन्स, जनरल व स्टेशनरी दुकाने, वॉच सेंटर, भांडी दुकाने यांना सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बॅनर, पेंटिंग, रेडियम वर्क, प्रिंटिंग प्रेस, फोटो स्टुडिओ, इंजिनिअरिंग व वेल्डिंग, टाईल्स व सॅनिटरी वेअर, कॅटरॅर्स व बिछायत, स्पोर्ट्स व म्युजिक दुकानांना गुरुवार व शुक्रवार

गॅस शेगडी दुरुस्ती, सायकल स्टोर्स, मोबाईल, कम्प्युटर, सायबर कॅफे, फर्निचर, कार असेसरीज, सराफा, आर्टिफिशयल ज्वेलरी, बँगल्स दुकाने गिफ्ट सेंटर ह्या दुकानांना शनिवारी व रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.