सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायत अंतर्गत १०६ गावे असून या गावातील पाणीटंचाई कडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे लक्ष आहे किंवा नाही या बाबत माहिती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गटविकास अधिकारी सुधाकर जाधव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सचिव यांना गावातील पाण्याच्या समस्या बाबतवेळोवेळी आढावा घेत आहे. एप्रिल ते जून
महिन्यात पाण्याची टंचाई भासू शकते याकरिता पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावाचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये १३ ग्रामपंचायती अंतर्गत १५ गावाचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत दाभाडी, येदलापूर, वल्हासा, धानोरा अंतर्गत गाडेघाट, येदलापूर धानोरा, झमकोला, पिंपरड, मागुर्ला, मूळगव्हान, मांगुर्ला, खडबडा, उमरी, हिवरा बारसा, दिग्रस, मांडवा, निंबादेवी व गवारा ग्रामपंचायतचा समावेश असून मुधाटी व मांडवा या गावकरिता टँकर ची मागणी आहे तर विहीर अधिग्रहण करीत रायपूर ,परसोडी,बोटोनी व लांडगी पोड या गावकरिता विहीर अधिग्रहण करिता प्रस्ताव आले आहे. वरील गावकरिता ९ विहीर अधिग्रहण ९ टँकर ने पुरवठा ९ बोअरवेलने पुरवठा, बोअरवेल अधिग्रहण व ३ उपाययोजना केलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वाढत्या उन्हाने रौद्र रूप दाखवणे सुरू केले आहे. तापमान ४५ अंशच्या जवळपास आहे प्रखर उन्हामुळे नदी ,नाले, तलाव,बोअरवेल च्या पाण्याची पातळी खालाऊन अनेक गावाना पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे पंचायत समिती सतर्क असून याकडे विशेष लक्ष असल्याचे गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी सांगितले.