विवेक तोटेवार, वणी: युवा मित्र मंच वणीच्या वतीने रविवारी दिनांक 7 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत साधनकर वाडीतील धनोजे कुणबी समाज भवनात पार पडणार आहे.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपला आहे. प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार वणतील युवा मित्र मंचच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर शासनाने दिलेले सर्व मार्गदर्शक तत्व पाळून घेतले जाण्र आहे. शिबिराचे संपूर्ण ठिकाण हे वेळोवेळी सॅनिटाईज केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. या शिबिरासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. तरी शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी दीपक रासेकर, शुभम गोरे, अनिकेत चामाटे, शुभम पिंपळकर, गीतेश वैद्य, शुभम इंगळे, सुमंत बच्चेवार, शंकर देरकर, संदीप गोहोकार, गौरव ताटकोंडावार, अभिषेक येसेकर, प्रसाद मत्ते, साई नालमवार, स्वप्निल बोकडे, सौरभ राजूरकर हे परिश्रम घेत आहे. या शिबिराला वणीतील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असून त्यांनीही या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9545959515, 7972284238, 9561762907, 7350503419, 8888686891, 8855847232, 9673136160, 7507759444